India vs West Indies Live Score 1st Test Day 1 Match Latest Updates: आशिया कप 2025 जिंकण्याच्या आनंदानंतर, टीम इंडिया आता त्यांच्या पुढील मोहिमेला सुरुवात करत आहे, ज्यामध्ये त्यांना रेड-बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची ही कसोटी मालिका भारताच्या घरच्या हंगामाची सुरुवात असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, अहमदाबादमध्ये पहिली कसोटी:
शुभमन गिल अहमदाबादमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी खूप उत्साही आहे. त्याने सांगितले की, “मी येथे अनेक वेळा टी-20 क्रिकेट खेळला आहे, पण कसोटी सामना खेळणे हे एक वेगळं अनुभव असणार आहे.” अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल तो म्हणाला, “आम्ही पूर्वी येथे खेळलो होतो तेव्हा ती काळ्या मातीची खेळपट्टी होती, पण यावेळी कसोटी लाल मातीच्या खेळपट्टीवर होणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत खेळपट्टी कशी वागते हे पाहणं खूप रोचक असेल.”