PM Modi Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर; नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो ३ चे उद्घाटन ८ ऑक्टोबरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो लाईन ३ आणि इतर विविध महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत.
८ ऑक्टोबरच्या रात्री पंतप्रधान राजभवन येथे मुक्काम करतील. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो ३ चे उद्घाटन हे या दौऱ्यातील प्रमुख आकर्षण असून, येत्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्याची अधिक माहिती अभिषेक मुठाळा यांनी दिली आहे.