Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे.
आधार कार्ड अपडेटसाठी शुल्कवाढ लागू; नवीन दर 2028 पर्यंत लागू राहणार
आधार कार्डातील माहिती दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना आता अधिक शुल्क भरावे लागणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 1 ऑक्टोबर 2025 पासून नवे दर लागू केले असून, हे दर 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहेत.
कोणत्या सेवा महागल्या?
-
डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल) यासाठीचे शुल्क आता ₹50 ऐवजी ₹75 झाले आहे.
-
बायोमेट्रिक अपडेट (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन) यासाठी आता ₹125 शुल्क आकारले जाईल. ऑक्टोबर 2028 नंतर हेच शुल्क ₹150 होणार आहे.
-
बायोमेट्रिक अपडेट लहान मुलांसाठी मात्र मोफत असेल.
कागदपत्र आणि इतर सेवा
-
कागदपत्र अपडेट करण्याची सुविधा myAadhaar पोर्टलवर 14 जून 2026 पर्यंत मोफत राहणार आहे. त्यानंतर एनरोलमेंट सेंटरवर जाऊन अपडेट केल्यास ₹75 शुल्क लागेल (पूर्वी ₹50).
-
ई-केवायसी किंवा इतर टूल्स द्वारे आधार प्रिंट घेण्यासाठी, पहिल्या टप्प्यात ₹40, तर दुसऱ्या टप्प्यात ₹50 शुल्क लागेल.
घरी भेट सेवा
जर आधार नोंदणीसाठी प्रतिनिधीला घरी बोलावलं गेलं, तर:
-
पहिल्या व्यक्तीसाठी ₹700 (GST सह)
-
प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी ₹350 शुल्क आकारलं जाईल.
UIDAI च्या नव्या शुल्करचनेमुळे नागरिकांनी वेळेवर आणि अचूक माहितीने आधार अपडेट करणं गरजेचं ठरणार आहे.