UPSC Results

UPSC Results

 मोहित अग्रवाल देशात पहिला, UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; IES अन् ISS पदांसाठी पाहा गुणवत्ता यादी

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारा आयोजित 2025 च्या युपीएससी आयईएस आणि आयएसएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यासाठी उमेदवार upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेची लेखी परीक्षा जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आली होती, आणि नंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती व व्यक्तिमत्त्व परीक्षण आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेच्या निकालानुसार, आयईएस पदासाठी 12 आणि आयएसएस पदासाठी 35 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

युपीएससी 2025 च्या निकालानुसार, आयईएस म्हणजे भारतीय आर्थिक सेवा (Indian Economic Service) मध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला याने पहिले स्थान मिळवले आहे. ऊर्जा रहेजा दुसऱ्या स्थानावर असून, गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच, भारतीय सांख्यिकी सेवा (Indian Statistical Service) 2025 साठी कशिस कसाना ने प्रथम स्थान मिळवले आहे. त्यानंतर आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर आणि शुभेंदू घोष तिसऱ्या स्थानावर आहेत. आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी एकूण 12 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. युपीएससीच्या सूचनेनुसार, उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या सत्यापनानंतर केली जाईल.

UPSC Results 2025: मोहित अग्रवालने आयईएसमध्ये देशात प्रथम स्थान मिळवले, तर आयएसएसमध्ये कशिस कसाना पहिल्या स्थानावर.

Related posts

ICMR – NIRRH Mumbai Bharti

TISS Bharti

District Hospital Pune Bharti